Pune Crime News | पोलीस भरती झाल्याचे सांगून सोसायटीत पेढे वाटले, फ्लेक्स लावले, पोलीस अभिनंदन करण्यासाठी गेल्यावर भलताच प्रकार आला समोर

Pune Crime News | Police recruitment was announced and banners were distributed in the society, flexes were put up, when the police went to congratulate them, a strange incident came to light

पुणे : Pune Crime News |  भाजीपाला विकणार्‍या तरुणाने आपण पोलीस भरती झाल्याचे आईला सांगितले. सोसायटीत पेढे वाटले. चौकामध्ये अभिनंदनाचा फ्लेक्स लावला. तेव्हा आपल्या हद्दीतील तरुण पोलीस भरती झाला हे पाहून नर्‍हे पोलीस ठाण्याचे पोलीस अभिनंदन करण्यासाठी घरी गेले. तेव्हा भलताच प्रकार समोर आला. प्रत्यक्षात तो पोलीस भरती झाला नसताना त्याचे तसे भासवून फ्लेक्स लावले. पोलीस वर्दीमध्ये फोटो काढून   मोबाईलमध्ये व्हॉटसअप स्टेटस ठेवले. नर्‍हे पोलिसांनी या अतिउत्साही तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

ऋषिकेश राजू जाधव Rishikesh Raju Jadhav (वय २६, रा. तिडके डेअरी, नर्‍हे रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश जाधव हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला पोलीस होण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने तो प्रयत्न करत होता. परंतु, त्याची उंची आड आली. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकत नव्हती. तसेच आता घरचे त्याच्या लग्नाचा विचार करु लागले होते. त्यामुळे त्याने आपल्या आईला पोलीस झाल्याचे खोटेच सांगितले. तसेच सोसायटीमध्ये पोलीस झाल्याबद्दल पेढेही वाटले.

घराबाहेर फ्लेक्स लावला. त्यात महाराष्ट्र पोलीस दलाचे चिन्ह, आपल्या फोटोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फोटो, खाली ऋषिकेश जाधव यांची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे फ्लेक्सवर लिहले होते. दोन दिवसांपूर्वी हा फ्लेक्स लावला होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर तो सार्वजनिक सेवक अथवा सरकारी नोकर नसताना पोलीस मध्ये भरती झाल्याचे भासविले. पोलीस वर्दीमधील फोटो मोबाईलमध्ये व्हॉटसअप स्टेटस ठेवल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आह. सहायक पोलीस फौजदार शिंदे तपास करीत आहेत.

You may have missed