Two Policemen Suspended In Pune | पुणे : वाहतूक नियम मोडणार्‍यांकडून पैसे घेणारे वाहतूक शाखेचे दोन पोलीस निलंबित, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवरुन कारवाई

Two Policemen Suspended In Pune | Pune: Two policemen of the traffic branch suspended for taking money from traffic violators, action taken on viral video on social media

पुणे : Two Policemen Suspended In Pune | वाहतूक नियम मोडले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेणार्‍या दोघा वाहतूक पोलिसांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.

पोलीस हवालदार अंकुश रामा पवार (Ankush Rama Pawar)आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण बालाजी रामगडे (Laxman Balaji Ramgde) अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

वाहतूक शाखेचे पोलीस चौकात वाहतूक नियमन करण्याऐवजी कडेला उभे राहून वाहनचालकाने सिग्नल तोडला की अचानक पुढे येऊन त्याला पकडतात, असे दृश्य शहरात सर्वत्र दिसते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलिसांनी चौकात थांबावे, चौकाच्या एका बाजूला जाऊन थांबलेले दिसले तर कारवाई करु, असा इशारा दिला होता. तरीही वाहतूक पोलीस चौकाच्या बाजूला उभे राहून वाहनचालक कधी नियम तोडतो, हे पहात उभे असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून पोलीस नियम मोडणार्‍या वाहनचालकांकडून पैसे घेताना कैद झाले होते.

पोलीस हवालदार अकुंश रामा पवार, पोलीस अंमलदार लक्ष्मण बालाजी रामगडे, मनोज पांडुरंग बदडे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओच्या अनुशंगाने जबाब नोंदविण्यात आला. सहकार नगर वाहतूक विभागातील हवालदार पवार, रामगडे यांना १९ एप्रिल २०२६ रोजी शारदा आर्केड यचा चौकामध्ये वाहतूक नियमन कर्तव्य करीता नेमण्यात आले होते. शारदा आर्केड चौकातील दुचाकी वाहनांने सिग्नल तोडल्याने या वाहनांवर कारवाई करण्याकरीता रस्त्याच्या बाजुला उभी करण्यात आली. एका दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुचाकीवरुन आलेल्या दुसर्‍या वाहनचालकाने पवार व रामगडे यांचे व्हिडिओ काढू लागला.

त्यांनी १९ एप्रिल रोजी एकूण ३ दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकही अ‍ॅबोट चलन करण्यात आलेले नाही. त्यातील एका दुचाकी वाहनचालकावर ५००रुपयांचे दंडात्मक कारवाई केली. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्याकडून १५० रुपये, एका वाहनचालकाकडून १५० रुपये, दुसरा वाहनचालक याच्याकडून २०० रुपये ऑनलाईन घेतल्याचे दिसून आले. कर्तव्य करीत असताना बेशिस्त बेजबाबदारपणे व पोलीस खात्यास अशोभनीय असे गैरवर्तन करुन कसुरी केल्याने दोघांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.

You may have missed