Pune Crime News | पुणे : कोरेगाव पार्कमधील हॉटेल वेलवेटमध्ये ग्राहकांना हुक्का पुरविणार्या हॉटेल मालकासह वेटरवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कोरेगाव पार्क येथील वेलवेट हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला असता ग्राहकांना हुक्का पुरवित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तंबाखुजन्य पदार्थ, हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य जप्त केले. हॉटेलचा मालक व वेटरवर गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेल मालक व मॅनेजर रुणमेश संजय चिल्लय Runmesh Sanjay Chillay (वय २६, रा. रोहन क्रिटिका, सिंहगड रोड, पु ल देशपांडे उद्यानाजवळ) आणि निरंजन साई उपेंद्र साई Niranjan Sai Upendra Sai (वय २०, रा. कवडेवाडी वस्ती, कोरेगाव पार्क) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार रुपेश शंकर पांगारे (वय २६) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांना ३१ जुलै रोजी रात्री माहिती मिळाली की, कोरेगाव पार्क येथील वेलवेट हॉटेलचा चालक ग्राहकांना चोरुन हुक्का पुरवित आहेत. या बातमीची खातरजमा करण्यासाठी सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस हवालदार वैभव लोणकर, अमित जाधव, सचिन पवार, नाथा मुकणे, रुपेश पांगारे हे पोलीस पथक तेथे गेले. तिसर्या मजल्यावरील हॉटेल वेलवेटमध्ये पोलिसांनी प्रवेश केला. आत ४ टेबलावर १० पुरुष हुक्का पॉट ठेवून हुक्का सेवन करताना आढळून आले. हॉटेल मालक व मॅनेजर रुणमेश चिल्लाळ व वेटर निरंजन साई हे ग्राहकांना सेवा पुरवताना दिसून आले. पोलिसांनी तेथील सर्व हुक्का पॉट व इतर साहित्य जप्त केले आहे. पोलीस हवालदार अभंग तपास करीत आहेत.
