Pune Crime News | पुणे : 2000 गुंतवणूकदारांच्या 43 कोटींच्या ठेवी घेणाऱ्या वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगे यांच्यावर गुन्हा दाखल; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

Pune Crime News | Pune: Case registered against Valentina Industries directors Santosh Bandal and Dnyaneshwar Chorge for taking deposits worth Rs 43 crore from 2000 investors; Economic Offences Wing takes action

पुणे : Pune Crime News | कंपनीत पार्टनर करुन घेतो, दरमहा १ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ते प्रत्यक्षात लोकांकडून ठेवी स्वीकारत होते. याचे पैसे घेऊन दुसर्‍याला दिले जात होते. आर्थिक गुन्हे शाखेने स्वत: पुढाकार घेऊन बेकायदेशीरपणे ठेवी स्वीकारत असल्याच्या कारणावरुन वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष नाथा बांदल Santosh Natha Bandal (रा. गिडणी पार्क, सॅलिसबरी पार्क)आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे Dnyaneshwar Anant Chorge (रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने ९ महिने गोपनीय चौकशी करुन स्वत: पुढाकार घेऊन ही कारवाई केली आहे.

https://www.instagram.com/p/DXT_hxWDFnw

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलेंटिना इंडस्ट्रीज या कंपनीच्या वतीने सुरु असलेल्या अनियमित ठेव योजनेसंबंधाने गोपनीय पडताळणी अहवाल आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी जुलै २०२५ रोजी दिला होता. त्याप्रमाणे चौकशी करुन कारवाई करण्यात आदेश देण्यात आला होता. पोलिसांनी गोपनीयरित्या माहिती काढली. त्यात कंपनीत १ लाख ते ९९ लाख रुपयांपर्यंत वेलेंटिना कंपनीमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. त्यावर ५ टक्के दरमहा परतावा देण्यात येईल. फिक्स डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणुक केल्यास १ टक्का व्याज दरमहा व तीन वर्षांनंतर गुंतवणुकीच्या ४ पट रक्कम परत देणार, या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास त्यास गुंतवणुकदार न समजता कंपनीमध्ये भागीदार म्हणून घेण्यात येईल. या भागीदार पत्रामध्ये महिना १ टक्के परतावा नमूद असेल. परंतु, प्रत्यक्षात ५ टक्के परतावा देण्यात येईल. या कंपनीमध्ये गुंतवलेली रक्कम वेलेंटिना कंपनीच्या सब्सिडियरी कंपन्यांच्या व्यवसायामध्ये गुंतवणार असल्याचे व त्यातून आलेला नफा गुंतवणुकदारांना देणार असल्याचे सांगितले. या कंपनीच्या अंतर्गत आतापर्यंत १० कंपन्या आहेत. आणखी ११ कंपन्या सुरु होणार आहेत.

रजिस्टार ऑफ कंपनीकडून माहिती मिळाली नुसार त्यामध्ये ज्ञानेश्वर चोरगे, संतोष बांदल, जयश्री संतोष बांदल, सुमषा ज्ञानेश्वर चोरगे हे संचालक असल्याचे दिसून आले. कंपनीचे सेक्रेटरी राहुल सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदविले असून कंपनीचे कामकाज नियमाप्रमाणे सुरु असल्याचे तसेच २०२२ पासून कंपनीमध्ये २ हजार लोकांनी गुंतवणुक केलेली असून त्यांची भागीदार म्हणून नोंद एम सी ए पोर्टलवर असल्याचे सांगितले. भागीदारांकडून लोन स्वरुपात घेतलेले पैसे वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवले जातात. त्यातून आलेल्या नफ्यातून १ टक्का दरमहा परतावा दिला जातो, असे सांगितले.

गुंतवणुकदारांच्या यादीत एकूण २ हजार १३६ गुंतवणुकदारांनी ४३ कोटी १९ लाख ८० हजार रुपयांची गुंतवणुक केली असून ती त्यांनी स्वीकारली असल्याचे सांगितले. त्यांच्या आणखी १४ कंपन्या नव्याने सुरु होणार आहेत. पेपरवर ११ हजार गुंतवणुकदार आहेत. कंपनीचा २०२४ -२५ चा ऑडिट बॅलन्स शीट रजिस्टार ऑफ कंपनीकडून प्राप्त झाला. त्यात एकूण टर्न ओव्हर ५६ लाख ८७ हजार रुपये नमूद केला आहे. तसेच नेटवर्थ उणे २ लाख ४० हजार रुपये नमूद केला आहे. यावरुन कंपनीला तोटा होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु ते लोकांकडून पैसे मिळवण्यासाठी आमिष दाखविण्यासाठी कंपनीचा टर्न ओव्हर ३०० कोटी रुपयांचा असल्याचे खोटे सांगत आहे. पेपरवर ३०० कोटी व ऑफ रेकॉर्ड ३ हजार कोटी टर्नओव्हरअसल्याचे सांगून जादा परताव्याचे आमिष दाखवत आहे.

यावरुन कंपनीने कोणत्याही शासकीय संस्थेकडून पूर्व परवानगी न घेता अंदाजे ४३ कोटी १९ लाख ९० हजार रुपये बेकायदेशीर ठेवच्या स्वरुपात स्वीकारले असल्याचे दिसून येत आहे. बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कंपनीची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. त्यात कंपनी ठेवी स्वीकारत असतानाही त्याला भागीदार असे संबोधत होती. कोणत्याही शासकीय संस्थेची पूर्वपरवानगी न घेता ठेवी स्वीकारत होते. काही जणांकडून पैसे घेऊन तेच परतावा म्हणून दिले जात होते. आमच्याकडे कोणी तक्रारदार आलेला नाही. परंतु, भविष्यात गुंतवणुकदारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले.

You may have missed