Pune Crime News | पुणे : 5 सराईत गुन्हेगारांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने 4 पिस्टल, 6 जिवंत काडतुसे केली जप्त

Pune Crime News | Pune: The Crime Branch's Unit 2 team caught 5 skilled criminals and seized 4 pistols and 6 live cartridges.

पुणे : Pune Crime News |  गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ५ सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून ४ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

सुफियान बशीर शेख Sufiyan Bashir Shaikh (वय २२, रा. जैन टॉवर समोर, धनकवडी), निलेश प्रभुलिंग कुंभार Nilesh Prabhuling Kumbhar (वय २१, रा. रजनी कॉर्नर, काकडे चाळ, बालाजीनगर), तुकाराम बाबासाहेब गवते Tukaram Babasaheb Gavate (वय १९, रा. रजनी कॉर्नर, बालाजीनगर), ऋषभ ऊर्फ ऋषि शिवाजी भगत Rishabh alias Rishi Shivaji Bhagat (वय २३, रा. त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ), अमित राजाराम पिलावरे Amit Rajaram Pilavre (वय २५, रा. सुभेदार तालीमजवळ, शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त १३ ऑगस्ट रोजी घालत होते. रेकॉर्डवरील आरोपी चेक करत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे व उज्वल मोकाशी यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, सहकारनगर येथील वनशिव वस्ती येथे काही जण संशयितरित्या थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहेत. या मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी करुन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ६१ हजार २०० रुपयांचे ४ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. त्यांच्यापैकी काही जणांवर खुन, खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे संरक्षणासाठी पिस्टल बाळगल्याचे त्यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तेजश्री पवार, शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, कुंदन शिंदे, नागनाथ राख, विनोद चव्हाण, संदिप शिर्के, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, ओमकार कुंभार, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार व विनायक वगारे यांनी केली आहे.