Pune Pimpri Crime News | 9 सायबर गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रथमच केली मोक्का कारवाई; ज्येष्ठ नागरिकाची 11 कोटींची केली होती फसवणूक
पुणे /पिंपरी : Pune Pimpri Crime News | बनावट ट्रेडिंग अॅपद्वारे ज्येष्ठ नागरिकाची ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी ९ सायबर गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तपासादरम्यान, फिर्यादींची गोठविलेली २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये फिर्यादी यांना परत मिळण्याबाबत न्यायालयामार्फत आदेश प्राप्त करण्यात आले आहेत.
अभय बाबासाहेब पाटील Abhay Babasaheb Patil (वय ३४, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), शिवतेज राजेंद्र पोटे Shivtej Rajendra Pote (वय ३०, रा. वाघोली), युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार Yuvraj alias Santosh Satish Mudaliar (वय ३५, रा. निंबाळकरनगर, लोहगाव), रॉनी ऊर्फ पंकज मंगू गिरीगोस्वामी Ronnie alias Pankaj Mangu Girigoswami (वय २४, रा. भिंडर, जि. उदयपूर, राजस्थान), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी Prahlad Prithviraj Gadri (वय २३, रा. ढुंढिया, ता. मावळी, जि. उदयपूर, राजस्थान), उमेश लक्ष्मीलाल भट्ट Umesh Laxmilal Bhatt (वय २१, रा. सदरबझार, भडसोरा, राजस्थान), महेश करबसपा उडचणे Mahesh Karbsp Udchane (वय २८, रा. रावळ पाडा, दहिसर पूर्व, मुंबई), राहुल बहादूरप्रसाद मोर्य Rahul Bahadur Prasad Maurya (वय २४, रा. रावळ पाडा, दहिसर पूर्व, मुंबई), शेख अब्दुल रहिस शेख अब्दुल रशीद Sheikh Abdul Raheem Sheikh Abdul Rashed (वय २६, रा. समतानगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून त्याद्वारे टोळीचा व स्वत:चा आर्थिक फायदा होण्यासाठी स्वत: टोळीतील सदस्यांनी एकत्रित व वैयक्तिकरित्या जाळे तयार करुन वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी आमिषे दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचे आमिष दाखवून सर्व सामान्य जनतेची आर्थिक फसवणूक केली आहे. टोळीतील सदस्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करुन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून फसवणुकीची रक्कम युएसडीटी सारख्या आभासी चलनात वर्ग करुन देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण केला आहे. या गुन्हेगारांनी संघटीतपणे पिंपरी चिंचवड, मुंबई शहर व मध्य प्रदेशात सायबर फसवणुकीचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. याची पडताळणी करुन अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा आदेश दिला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ़ शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार दीपक भोसले, हेमंत खरात, सुभाष पाटील, विनायक म्हसकर, पोलीस अंमलदारअतुल लोखंडे, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, महेश मोटकर, प्रविण शेळकंदे, सोपान बोधवड, सुरज शिंदे, दीपक माने, स्वप्नील खणसे, शिवाजी बनसोडे यांनी केली आहे.
