Pune Crime News | मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत वडगाव शेरी येथे बेकायदा दीड लाखांचा गुटखा पोलिसांनी केला जप्त

Pune Crime News | Under Mission Crackdown, police seized illegal gutkha worth one and a half lakh rupees in Vadgaon Sheri

पुणे : Pune Crime News |  मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत विशेष पथकाने वडगाव शेरी येथे छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल करत १ लाख ५९ हजार रुपयांचा गुटखा, तंबाखुजन्य  पान मसाला, सुगंधी तंबाखुचा साठा जप्त केला आहे.

यलप्पा तिरकप्पा शेट्टी Yalappa Tirakappa Shetty (वय ३५, रा. टेम्पो चौक, सचिन नगर, वडगाव शेरी) आणि चंद्रकांत फुलचंद पटवा Chandrakant Phulchand Patwa (रा. विद्यानगर, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

परिमंडळ ७ अंतर्गत बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार तिरुपती रामचंद्र लिंगण्णा यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी ते पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, यलप्पा शेट्टी हा गुटखा, तंबाखु व पान मसाला विक्री करीत असून त्याने त्याचा मोठा साठा करुन ठेवला.

या बातमीची खातरजमा करून पोलीस टेम्पो चौकात आले. तेथे त्यांना यलप्पा शेट्टी मिळून आला. त्यांनी शेट्टी याच्याकडे चौकशी केली़ तेव्हा त्याने जवळच असलेल्या मोझेसवाडी येथील एका घरात गुटखा, पानमसाला लपवून ठेवला असल्याचे सांगितले. खोलीचे कुलूप उघडून पोलीस आत गेल्यावर पांघरुणाखाली गुटखा व इतर तंबाखुजन्य पदार्थ झाकून ठेवलेले मिळाले. पोलिसांनी १ लाख ५९ हजार ८८० रुपयांचा माल जप्त केला. हा माल चंद्रकांत पटवा याच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस हवालदार सुशिल बेंद्रे, विलास केदारी, गणेश इथापे, पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे, शुभम चिनके, अमोल सरतापे, लालु कण्डे यांनी ही कारवाई केली आहे.

You may have missed