Pune Crime News | दारु पिण्याच्या वादातून नदीपात्रात तरुणाचा खुन; खुन झालेल्याची ओळख पटवून डेक्कन पोलिसांनी आरोपी केले निष्पन्न
पुणे : Pune Crime News | डेक्कन येथील नदीपात्रात तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. दारु पिण्याच्या वादातून या तरुणाचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी खुन झालेल्याची ओळख पटवली असून त्याला मारणारे दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत.
कुशल कसबे (वय ३३, रा. महात्मा फुले पेठ) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलीस शिपाई आकाश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीपात्रातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती रविवारी सकाळी डेक्कन पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सुरुवातीला मृतावस्थेत पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी खुन झालेल्या तरुणाची छायाचित्रे सर्वत्र पाठविली होती. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ती वितरित करण्यात आली होती. त्यातून विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुशल कसबे हा असल्याचे दिसून आले. कुशल कसबे याच्यावर २०१३ मध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात लोकांच्या भावना भडकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कुशल तीन वर्षांपूर्वी कात्रज येथील पीएमपी आगारात कंत्राटी पद्धतीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तेथील काम त्याने सोडले होते. बेरोजगार असलेल्या कुशलला दारू पिण्याचे व्यसन होते़ त्यातूनच त्याचा दोघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याचे उघड होत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करीत आहेत.जयसिंग हा फरशी बसविण्याचे काम करतो. तो सतत दारु पिऊन येऊन मारहाण करत असल्याचे प्रतिक्षा सांगत होती. जानेवारी २०२६ मध्ये जयसिंग याने मारुती स्विफ्ट डिझायर कार घेतली. गाडीचे हप्ते फेडण्यासाठी ते पैशांची मागणी करु लागले. १७ एप्रिल रोजी सकाळी जयसिंग याने फोन करुन मुलीला तुम्ही हेच शिकवले का, असे म्हणून प्रतिक्षा हिला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रतिक्षा ओरडत असल्याचा आवाज त्यांना फोनवर येत होता. त्यांनी जयसिंग याला मुलीला आणून घरी सोड नाही तर मी उद्या न्यायला येतो, असे सांगितले. पण, ती वेळच आली नाही. सासरी होणार्या छळाला कंटाळून प्रतिक्षा हिने रात्री ११ वाजता गळफास घेऊन आपले जीवन संपविले. वाघोली पोलिसांनी पूर्वीची आत्या आणि आताची सासु व पतीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.
