Pune News | पुणे : विमाननगर-लोहगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; बंगल्यात घुसून कुत्र्यावर हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

Pune News | Pune: Tiger panic in Vimanagar-Lohagaon area; enters bungalow and attacks a dog, incident caught on CCTV

पुणे : Pune News | विमाननगर-लोहगाव परिसरातील हरणतळे वस्ती येथे मध्यरात्री बिबट्याने एका बंगल्यात घुसून तेथील पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यानंतर बिबट्याने कुत्र्याला तोंडात धरून घटनास्थळावरून नेल्याचे समोर आले असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने स्थानिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर माजी सरपंच प्रीतम खांदवे यांनी सांगितले की, मध्यरात्री बिबट्या परिसरात दिसून आला असून त्याने कुत्र्यावर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वन विभाग आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर वन विभागाकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed