Pune Traffic Updates | पुणे : कौन्सिल हॉल चौकातून साधू वासवानी चौकाकडे जाणारा रस्ता 22 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
पुणे : Pune Traffic Updates | बंडगार्डन वाहतूक विभाग अंतर्गत कौन्सिल हॉल चौकातून साधू वासवानी चौकाकडे जाणारा रस्ता २२ ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून साधू वासवानी चौकाकडून येणाऱ्या वाहनांकरिता एकेरी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी कळविली आहे.
या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी कौन्सिल हॉल चौकातून सरळ साधू वासवानी चौकाकडे न जाता डावीकडे वळण घेऊन ब्लू नाईल चौकाकडून व उजवीकडे वळण घेऊन पुढे आयबी चौक येथून इच्छित स्थळी जावे.
तसेच किराट चौक ते मॅरेज ब्युरो कडे जाणाऱ्या वाहनांना चर्चपत्र असतात एकेरी वाहतूक करण्यात येत असून या रस्त्यावरून एस. बी. आय. बँकेकडून किराट चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी मॅरेज ब्युरो पासून डावीकडे वळून सरळ पुढे इच्छित स्थळी जावे. वाहतूक मार्ग बदलाबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास वाहतूक शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नंबर ६, एअरपोर्ट रोड, पुणे यांच्या कार्यालयात ५ सप्टेंबर पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात असेही कळविण्यात आले आहे.
