IPS Transfer In Maharashtra | IPS निखिल पिंगळे साताराचे तर IPS राजकुमार शिंदे वाशिमचे पोलीस अधीक्षक; राज्यातील 9 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या
पुणे : IPS Transfer In Maharashtra | राज्यातील ९ आयपीएस अधिकार्यांच्या राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा येथे तर, डॉ. राजकुमार शिंदे यांची वाशिमचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. पुण्यातून दोन पोलीस अधिकार्यांची बदली केली असली तरी त्यांंच्या दोन पोलीस अधिकार्यांच्या जागा रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत.
बदली झालेले पोलीस अधिकारी (सध्याचे पद) बदली नंतरचे पद
तुषार दोशी (पोलीस अधीक्षक, सातारा) पोलीस अधीक्षक, सांगली
निखिल पिंगळे (पोलीस उपायुक्त, पुणे) पोलीस अधीक्षक, सातारा
संदिप घुगे (पोलीस अधीक्षक, सांगली) पोलीस उपायुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता, मुंबई
योगेश गुप्ता (पोलीस अधीक्षक, कोल्हापूर) पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र
निलोत्पल (पोलीस अधीक्षक, गडचिरोली) पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
एम रमेश (अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली) पोलीस अधीक्षक, गडचिरोली
महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण, पुणे
श्रीकांत ढिवरे (पोलीस अधीक्षक, धुळे) पोलीस अधीक्षक जळगाव
राजकुमार शिंदे (पोलीस उपायुक्त, पुणे) पोलीस अधीक्षक, वाशिम
