Pune Crime News | 90 लाखांचे रोकड, दागिन्यांचे पार्सल घेऊन पळून गेलेल्या कामगारासह चौघांना खडक पोलिसांनी 10 हजार किमीचा प्रवास करुन केले जेरबंद, उत्तर प्रदेशातून 26 लाखांचा ऐवज जप्त
पुणे : Pune Crime News | पुण्याहून मुंबईला सोन्या चांदीचे दागिने, रोकड असे ९० लाखांचे कुरीयरचे पार्सल घेऊन जाणारा कामगार वाटेत उतरुन पळून गेला होता. गेल्या ३ महिन्यात खडक पोलिसांचे पथक तब्बल ३ वेळा उत्तर प्रदेशात जाऊन आले. तब्बल १० हजार किमींचा प्रवास केल्यानंतर या कामगारासह त्याच्या इतर तीन साथीदारांना खडक पोलिसांनी उत्तर प्रदेशातून जेरबंद केले आहे.
विशाल सत्यपालसिंग चौहान Vishal Satyapalsingh Chauhan(वय २०), विकासकुमार रामबीरसिंग जाधोन Vikas Kumar Rambirsingh Jadhon (वय २५), बिनेश सत्यपालसिंग चौहान Binesh Satyapalsingh Chauhan(वय २७, तिघे रा. इटा, थाना वागड, तहसील जलेसर, मिसाकला, उत्तर प्रदेश), ब्रिजेश सुरेंदसिंग चौहान Brijesh Surendsingh Chauhan (वय १८, रा. विजयनगर, नरदोली ठाणा सिकंदर, वैश्य कासगंज, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत जितेंद्र ऋषिकेश सिंह (वय ३३, रा. घोरपडी पेठ) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचा एस जी एल जे पी लॉजिस्टिक या नावाने कुरिअरचा व्यवसाय आहे. ते ग्राहकांचे सोने व पैसे कुरिअरने पाठविण्याचे काम करतात. त्यांनी ५ ऑगस्ट रोजी विशाल चौहान याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा ९० लाख ३३ हजार रुपयांचे पार्सल मुंबईच्या कार्यालयात देण्यास दिले होते. त्याने मुंबईला एस टी ने जाताना वाटेत वाकड पुलावर उतरला व तेथून तो पळून गेला होता. हा गुन्हा घडल्यानंतर विशाल चौहान याचा शोध घेण्यात आला. मात्र तो आपल्या गावी नातेवाईकांच्या घरी पळून गेल्याचे आढळून आले. तपासादरम्यान विशाल चौहान याचा भाऊ बिनेश चौहान, मित्र विकासकुमार जाधोन, राधेश्याम ऊर्फ पिंकु चौहान आणि ब्रिजेश चौहान यांनी कट रचल्याचे निष्पन्न झाले.
सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्हाडे, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, हेमंत पेरणे, मयुर भोसले, सैफ नदाफ, निलेश साबळे आणि विकास पांडुळे यांनी तब्बल २५ दिवस दिवस रात्र १० हजार किमीचा पेक्षा जास्त प्रवास केला. उत्तर प्रदेश, नोएडा, डेहराडुन, उत्तराखंड या राज्यांमध्ये तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला. बातमीदारांमार्फत माहिती काढली. हे आरोपी उत्तर प्रदेशातील एटा, कासगंज, गौतम बुद्धनगर या जिल्ह्यांमध्ये लपून राहत असल्याची माहिती मिळाली. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी हे तपास पथक ३ वेळा उत्तर प्रदेशात गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत विकासकुमार जाधोन याच्या घरातून १६ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या १२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन बिस्किट जप्त करण्यात आले. गुन्ह्यात मदत करणारा त्याचा मेव्हणा ब्रिजेश चौहान याला अटक करुन त्याच्या घरातून ७ लाख रुपये रोख, एक सोन्याची अंगठी आणि एक चांदीची चैन जप्त करण्यात आली. या सर्व ऐवजाची किंमत २६ लाख ३३ हजार रुपये आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जºहाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, मयुर भोसले, हेमंत पेरणे, अमित जमदांडे, निलेश साबळे, विकास पांडुळे, सैफ नदाफ, उमेश मठपती, संतोष साबळे, सागर कुडले यांनी केली आहे.
