Pune Crime News | पुणे : चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणीचे अश्लिल फोटो, व्हिडिओ व्हायरल करुन केले बदनाम

Pune Crime News | Pune: Sexual assault on a young woman with the lure of working in a film; Vulgar photos and videos of the young woman were made viral and defamed

पुणे : Pune Crime News |  एका चित्रपटात छोटी भूमिका केलेल्या तरुणीला दुसर्‍या चित्रपटासाठी ऑडिशन घेऊन लवकरच चित्रपटात काम देतो, असे आमिष दाखवून तिच्याशी संपर्क वाढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तिचे अश्लिल फोटो, व्हिडिओ काढून ते व्हॉटसअ‍ॅपद्वारे व्हायरल करुन बदनामी केली.

याबाबत एका २४ वर्षाच्या तरुणीने नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभिजित गाडे Abhijit Gade (वय २७, रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोंबर २०२४ ते १७ एप्रिल २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने पूर्वी एका चित्रपटात छोटी भूमिका केली होती. तिला एका माहितीगाराने लवकरच एक चित्रपट येणार असून त्यासाठी ऑडिशन घेण्याचे काम सुरु आहे, असे सांगून  बावधन येथील ऑफिसमध्ये संपर्क करण्यास सांगितले. ही तरुणी ऑडिशनसाठी बावधन येथील ऑफिसमध्ये गेली होती. तेथे तिची अभिजित गाडे याच्याशी ओळख झाली. त्याने या तरुणीशी संपर्क वाढविला. तुला लवकरच चित्रपटात काम देणार आहे, असे आमिष दाखविले.

वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सुरुवातीला कॉफी पिण्याच्या निमित्ताने तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर एके दिवशी  चित्रपटाविषयी बोलायचे आहे, असे सांगून तिला तो  नर्‍हे  येथील एका लॉजवर घेऊन गेला. तिथे तिच्याशी शरीर संबंध ठेवले. तिचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले. तिने वारंवार चित्रपटातील कामाविषयी विचारले. तेव्हा त्याने धमकाविण्यास सुरुवात केली. तिचे अश्लिल फोटो व व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे व्हायरल करुन बदनामी केले. चित्रपटात काम न देता फसवणूक करुन लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद या तरुणीने नर्‍हे पोलिसांकडे दिली.

अभिजित गाडे हा आपले अस्तित्व लपवून वावरत आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी सांगितले.

You may have missed